बार्शी – महाराष्ट्र गृहनिर्माण सल्लागार समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जा माजी सहअध्यक्ष व भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांचे अभियंता पुत्र प्रतीक मिरगणे यांच्या विवाह स्वागत समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभेच्छा दिल्या.
वरळी मुंबई येथील “द पॅलेस हॉल” या आलिशान दालनात भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांचे पुत्र प्रतीक व बीड माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांच्या सुविद्य सुकन्या चि.सौ.का. प्रतीक्षा यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ संपन्न झाला.
कार्यमग्न आणि अत्यंत धावपळीच्या दिनक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाहाऊसिंगचे माजी कॅबिनेट मंत्री दर्जा सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या सोबत असलेल्या जुन्या ऋणानुबंधांची नाते जपत मिरगणे यांचे पुत्र अभियंता प्रतीक मिरगणे यांच्या विवाह स्वागत समारंभात दर्शवलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली.
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभावरुन मुंबईत परतलेल्या आणि अनेक व्यस्त कार्यक्रमांची मालिका समोर असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांनी मिरगणे परिवाराच्या या विवाह स्वागत समारंभात आपुलकीने उपस्थिती दर्शवत मिरगणे परिवाराला वेळ दिला. तसेच मिरगणे यांचे पुत्र अभियंता प्रतीक मिरगणे यांच्यासोबत संवाद साधला व त्यांच्या परदेशातील उच्चशिक्षणाची अतिशय आपुलकीने चौकशी केली व त्यांना मनमोकळेपणाने शुभाशीर्वाद दिले. मुख्यमंत्र्यांच्या या उपस्थितीमुळे त्यांच्या भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्या सोबत असलेल्या दृढ संबंधांची प्रचिती आली.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, अकलूजचे आमदार उत्तम जानकर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जळगावचे आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार विक्रांत पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ठाकरे गटाचे प्रमुख नेते हर्षल प्रधान, राज्य शिखर बँकेचे अविनाश महागावकर, रोहयो समितीचे अध्यक्ष शहाजीराव पवार, नगरविकास खात्याचे अवर मुख्य सचिव असीम गुप्ता, सनदी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उद्योजक पृथ्वीराज कोठारी, उद्योजक राम जगदाळे, पोलीस अधिकारी शिरीष पवार, पत्रकार अतुल कुलकर्णी, निलेश खरे, विनोद राऊत, महेश म्हात्रे, डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


























