सांगोला – महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे सदस्य सुरेश फुले व प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांचे हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज हे बहुजनांसाठी कार्य करणारे राजे होते. त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना आपल्या मंत्री मंडळात घेतले होते. तसेच ते थोर साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच खानदेशापासून तंजावर पर्यंत राज्य स्थापन करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.
आजच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची गरज असून, त्यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने करावे असे मत डॉ.सुरेश भोसले यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन डॉ.एम.डी.वेदपाठक, प्र.अधिक्षक विलास माने, शंकर माने, मारुती कोळी यांनी केले.

























