माळशिरस – शासनाने छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियाना अंतर्गत समाधान शिबीर आयोजित करून सर्वसामान्यांना एकाच छताखाली विविध योजनेचा लाभ देण्याचा उपक्रम सुरू केला असून याचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे सह आयुक्त संतोष भोरे यांनी माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशालेत समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी तहसीलदार सुरेश शेजुळ,उपनिबंधक रूपाली फडके, नगरसेविका रेश्मा टेळे, मंडळ अधिकारी विजय लोखंडे,मुख्याध्यापक धनंजय केसकर,महसूल अधिकारी रोहन कटकरे,निलेश कुंभार,शरद खांडेकर,रोहित गायकवाड, करिश्मा जाधव,अश्विनी नागटिळक, नवनाथ वळकुंदे,अशोक सिदवाडकर,
तुकाराम सावंत, रामदास ठोंबरे, नाना करडे, अप्पा वीरकर,यांच्यासह लाभार्थी,नागरिक,विद्यार्थी उपस्थित होते.लाभार्थ्यांना सुविधा देण्यासाठी,आरोग्य विभाग,नगर पंचायत,आपले सरकार सेवा केंद्र,कृषी विभाग,आदी विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांना दाखले,दोन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, फळबाग प्रमाणपत्र,यासह विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले.
फोटो.सूर्यकांत पाटील यांना ट्रॅक्टर चावी देताना सह आयुक्त संतोष भोरे व मान्यवर


























