पंढरपूर – अधिक मासात येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूर नगरपरिषदेने विशेष ॲक्शन प्लॅन तयार केलाआहे. शहरातील स्वच्छतेसह येणाऱ्या भाविकांना मोफत पार्किंगची देखीलसुविधा पालिका देणार असल्याचीमाहिती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
अधिक मासा निमित्त केलेल्या नियोजनाची माहिती देताना मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले की, यंदा पुरुषोत्तम तथा अधिक मास आहे. येत्या १७ मे पासून या अधिक मासाची सुरुवात होत आहे. अधिकमासा निमित्त लाखो भाविक पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी येतअसतात. याच पार्श्वभूमीवर पंढरीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुंदर पंढरपूरचा अनुभव देण्यासाठी तसेच येथीलवास्तव्यात अधिकाधिक सोयी सुविधा देण्याबाबत पंढरपूरनगरपालिकेने यावर्षी अधिक महिन्यासाठी नेटके नियोजन केले आहे.
पंढरपूर पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या नेटक्या नियोजना बाबतची माहिती देताना सांगितले की, शहरातील स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न तसेच शहरात विविध ठिकाणी चार चाकी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तसे फलक ज्या त्या पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत.
येणाऱ्या भाविकांना चंद्रभागा स्नान तसेच विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन झाल्यानंतर शहर एकदम स्वच्छ आणि नीटनेटके दिसण्यासाठी पालिकेचे विशेष प्रयत्न सुरू असुन त्या प्रमाणे चंद्रभागा वाळवंट, पासष्ठ एकर, मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्गाच्या आतील लहान,मोठे गल्शली बोळ, शहरातील महत्वाचे मठ, धर्मशाळांची ठिकाणी या ठिकाणी नियमित सफाई केली जाणार असल्याचे देखील पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.


























