Sunday, August 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त दिग्गज संघांची विजयी सलामी!

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त दिग्गज संघांची विजयी सलामी!
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) स्पोर्ट्स क्लब आयोजित ‘पहिली व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा २०२६’ परळ येथील ऐतिहासिक विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या लाल मैदानावरील कै. विवेकानंद पैगावकर क्रीडानगरीत शानदार वातावरणात सुरू झाली. उद्घाटनाच्या दिवशीच मैदानावर चुरशीचे सामने, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येक गुणासाठी झुंज पाहायला मिळाली. आज झालेल्या सामन्यांत बँक ऑफ इंडिया, महावितरण कंपनी, नेवल डॉक आणि मुंबई पोलीस यांनी दमदार विजय नोंदवत विजयी सलामी दिली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राहुल सिन्हा (महाव्यवस्थापक, एचआरएमडी, सेंट्रल ऑफिस), भारताचे माजी कुस्तीपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेते पप्पू यादव तसेच आरबीआय स्पोर्ट्स क्लबचे जनरल सेक्रेटरी सचिन नरसप्पा उपस्थित होते.

 

बँक ऑफ इंडियाचा अनुभव कामी; महानगरपालिकेवर थरारक विजय

व्यावसायिक गटाच्या पहिल्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १९-१७ (मध्यंतर १०-१०) असा चुरशीच्या लढतीत २ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला सामना बरोबरीत सुटल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र अनुभवी प्रशिक्षक विवेक आंब्रे यांच्या रणनीतीमुळे बँकेने सामन्यावर पकड मजबूत केली. विजयी संघाकडून जनार्दन सावंत (१.३०, १.२० मि. संरक्षण व ५ गुण), मयुरेश मोरे (१.४०, १.२० मि. संरक्षण व १ गुण), अर्पित तिवारी (१, १.४० मि. संरक्षण व २ गुण) आणि मनोज चौधरी (१.२० मि. संरक्षण व ५ गुण) यांनी अप्रतिम खेळ करत विजय निश्चित केला. तर पराभूत महानगरपालिकेकडून निखिल वाघे (१.२० मि. संरक्षण व २ गुण), आदित्य पाटील (१, १.१० मि. संरक्षण व १ गुण), अजय मित्रा आणि निमेश चौगुले (प्रत्येकी ३ गुण) यांनी जोरदार लढत दिली, मात्र ती अपुरी ठरली.

 

महावितरणचा विजेच्या वेगाने विजय; गंदेकर इलेक्ट्रिकल्सची झुंज व्यर्थ

दुसऱ्या सामन्यात महावितरण कंपनीने गंदेकर इलेक्ट्रिकल्स प्रा. लि. वर १५-१४ (मध्यंतर १३-६) असा ७.१० मि. राखून रोमांचक विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या महावितरणने मध्यंतरात मोठी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून सम्यक जाधव (१.२० मि. संरक्षण व २ गुण), अनिकेत चेंदवणकर (१.४०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) आणि प्रतीक वाईकर (२ मि. संरक्षण व १ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. तर पराभूत गंदेकर इलेक्ट्रिकल्सकडून गौरव कुडव (४ गुण), कुशल मुकने (१.१०, १.२० मि. संरक्षण व १ गुण) आणि कुशांग वैश्य (३ गुण) यांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले.

 

नेवल डॉकचा संयमी खेळ; ठाणे स्पेशल पोलीस सेलवर मात

तिसऱ्या सामन्यात नेवल डॉकने ठाणे स्पेशल पोलीस सेलचा १०-९ (मध्यंतर ८-५) असा ७.१० मि. राखून पराभव करत शानदार विजय नोंदवला. या सामन्यात नेवल डॉकच्या खेळाडूंनी अचूक रणनीती आणि मजबूत संरक्षणाच्या जोरावर वर्चस्व राखले. विजयी संघाकडून सार्थक जूनघरे (१.५०, २.३० मि. संरक्षण व ३ गुण), अनंत साटळे (२, १.४० मि. संरक्षण व ३ गुण) आणि हितेन भोईर (दोन्ही डावात प्रत्येकी १.५० मि. संरक्षण) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर पराभूत ठाणे स्पेशल पोलीस सेलकडून चेतन बावने (२.१० मि. संरक्षण), श्रीधर देसाई (१.२०, १.१० मि. संरक्षण व ६ गुण) आणि दीपक मोरे (१.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी झुंजार खेळ केला.

 

मुंबई पोलिसांचा ‘पोलिसी खाक्या’; यजमान आरबीआयवर थरारक विजय

दिवसातील चौथ्या आणि सर्वाधिक रंगतदार सामन्यात मुंबई पोलिसांनी यजमान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघावर १७-१५ (मध्यंतर ९-९) असा २ गुणांनी थरारक विजय मिळवला. मध्यंतराला सामना बरोबरीत असल्याने प्रत्येक क्षण रोमांच वाढवत होता. अखेरीस पोलिसांच्या अचूक डावपेचांमुळे त्यांनी विजय खेचून आणला. मुंबई पोलिसांकडून अक्षय खापरे (१.४० मि. संरक्षण व २ गुण), निखिल घाडगे (१.१०, नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण), सोहेल शेख (१.४०, १.३० मि. संरक्षण व ५ गुण) आणि सोहेल कलावंत (२ मि. संरक्षण व १ गुण) यांनी दमदार खेळ करत विजय निश्चित केला. तर पराभूत आरबीआय संघाकडून अथर्व खोचाडे (१.१० मि. संरक्षण व १ गुण), सिद्धेश चोरगे (१ मि. संरक्षण व ५ गुण), सुजल देव्हारे (१.३०, १.२० मि. संरक्षण), हर्षल मेहर (१.३०, १ मि. संरक्षण व ३ गुण) आणि सुफीयान शेख (२.२० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी कडवी झुंज दिली, मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही.

Post Views: 90
Previous Post

वीरशैव लिंगायत बणगार युवक संघटना वतीने स्वयं जनगणना मोहीम

Next Post

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

महापालिकेतील ३४ जणांचा अधिकारी-कर्मचारी गुणवंत पुरस्काराने सन्मान 

महापालिकेतील ३४ जणांचा अधिकारी-कर्मचारी गुणवंत पुरस्काराने सन्मान 

August 16, 2026
विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेसच्या १४ खेळाडूंची पूणे येथील स्केटींग रेकाॅर्डमध्ये उल्लेखनीय कामगिरी

विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेसच्या १४ खेळाडूंची पूणे येथील स्केटींग रेकाॅर्डमध्ये उल्लेखनीय कामगिरी

August 16, 2026
पोलीस अंमलदार रमेश कोर्सेगाव यांना भारत सरकारचे उत्कृष्ट सेवा पदक

पोलीस अंमलदार रमेश कोर्सेगाव यांना भारत सरकारचे उत्कृष्ट सेवा पदक

August 16, 2026
सुयश विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

सुयश विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

August 16, 2026
शिवकुमार पाटील यांना ‘स्व. प्रल्हाद भाऊसो चव्हाण जीवनगौरव पुरस्कार जाहीर

शिवकुमार पाटील यांना ‘स्व. प्रल्हाद भाऊसो चव्हाण जीवनगौरव पुरस्कार जाहीर

August 16, 2026
माढ्यात पाणंद रस्त्यासाठी शेतकरी महिलांचे आमरण उपोषण

माढ्यात पाणंद रस्त्यासाठी शेतकरी महिलांचे आमरण उपोषण

August 16, 2026
भेंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रभाकर दळवी यांची बिनविरोध निवड

भेंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रभाकर दळवी यांची बिनविरोध निवड

August 16, 2026

महावितरण कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1073833

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!