तुळजापूर – तालुक्यातील अणदूर येथील नीलकंठेश्वर मठाचे मठाधीपाती श्री प्रभू लिंगेश्वर महास्वामींजींचे जन्म शतक महोत्सव, वैराग्यमूर्ती, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांचा पट्टाभीषेक रौप्य महोत्सव व जन्मदिन सुवर्ण महोत्सव, अशा या त्रिवेणी धार्मिक कार्यक्रमास, आज जगदगुरूंचे आगमन झाले, त्यांचा भव्य दिव्य अड्डपालखी सोहळा, निलकंठेश्वर मठ ते कार्यक्रम स्थळापर्यंत अड्डपालखीतून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गाव, पंचक्रोशीतील हजारो भक्त भाविक यात सहभागी झाले होते.
लिं.प्रभूलिंगेश्वर जन्म शतमानोत्सव,मठाधिपती श्री. ष.ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी पट्टाभिषेक रौप्यमहोत्सव व जन्मदिन सुवर्ण महोत्सवानिमित्त आलेल्या श्री श्री श्री१००८ जगद्गुरु विरसिंहासनाधिश्वर प्रसन्न रेणूकवीर, सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी रंभापूरी महापीठ,जगद्गुरू सिंहासनाधिश्वर सिध्दलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उजैन महापीठ,जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य काशी महापीठ,जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य श्रीमद् काशी महापीठ आदीं महागुरुवर्यांचा अड्डपालखी महोत्सव जलकुंभ मिरवणूक,इतकी भव्य दिव्य होती या मध्ये जलकुंभ डोक्यावर घेऊन शेकडो महिला एकाच रंगाच्या साडीत सहभागी झाल्या होत्या, केरळातील 40 कलाकारांचे आट्टम वाद्य मिरवणुकीचे खास आकर्षण होते तर, अक्कलकोट च्या हालग्याचा कडकडाट मोठा होता, तर तुतारीचा बादशाह दोड्डी तुतारी ग्रुप आपल्या 20 कलाकारासह तुतारीचा निनाद करीत होता, हळदे यांचा शाही बँड,बाजा या शिवाय धनगरी ढोल, टाळ मृदुंग, शिवयोगींच्या व जगदगुरूंच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते, अशा या अड्डपालखी सोहळा मिरवणुकीत युवकांची संख्या लक्षणीय होती मिरवणूक मार्गातील प्रत्येक रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दुकानापुढे थंडगार पाण्याचे जार ठेवले होते एवढी मोठी मिरवणूक पण शिस्तीत, सावकाश सर्व ग्रामस्थानी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली, वाजत गाजत ही मिरवणूक भव्य अशा स्व.सी. ना. आलुरे गुरुजी सभामंडपात आली, त्या नंतर जगदगुरूंचे आशीर्वचन झाले त्या नंतर महाप्रसाद देण्यात आला या कार्यक्रमाला जवळपास 20 ते 25 हजार नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.
Post Views: 13