पंढरपूर, दि.२० मे – पंढरपूर मध्ये अवैध वाळु उपसा करणा-या वाळु माफियांनी चक्क चंद्रभागेचे पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या वाळवंटातील वाळु चोरी करता यावी यासाठी विष्णुपद बंधा-याचे दरवाजे काढून टाकले आहेत. अवैध वाळुमाफियांचे खरंतर हे खुप मोठे धाडस असुन त्यांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिले आहे.अवैध वाळु उपसा करणाऱ्यांना आवर घालणे जर प्रशासनाला जमत नसेल, विष्णु पदबंधा-याच्या दरवाजांचे संरक्षण करणे जमत तर शासनाने ही जबाबदारी आमच्यावर सोपवावी, मग आम्ही बंधा-याचे ही रक्षण करू आणि अवैध वाळु उपसा सुध्दा रोखू असं आवाहन येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले आहे.
गणेश अंकुशराव यांनी विष्णुपदावरील बंधा-याची पाहणी केली असता येथील दरवाजे अवैध वाळु उपसा करणारांनी काढून फेकले असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. सध्या अधिक मास सुरू असून त्यानिमित्ताने पंढरपुरात दर्शनासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत, परंतू बंधा-याचे गेट काढल्याने नदीपात्रात साठलेले पाणी वाहून जात आहे, परिणामी वारकरी भाविकांच्या स्नानाची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे शासनाने तातडीने यावर उपाय योजना करावी व यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी असे आवाहन हीयावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी केले आहे.
Post Views: 6