
जालना – येथील भुषण जवाहर जैस्वाल व त्यांची पत्नी मनिषा भूषण जैस्वाल यांनी निवा बुपा हेल्थ इंनशोरन्स कपंनी कडे आपला कुटूंब आरोग्य विमा काढला होता.मात्र हे दोघे दाम्पत्य आजारी पडले त्यांनी काढलेल्या विमा कपंनी कडे आरोग्य विमा मिळावा यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता करून विमा कपंनी कडे त्याची मागणी केली परंतु या विमा कंपनीने मात्र दोघे आजारी पडल्यावर त्यांचा क्लेम मंजूर केला नाही त्यांचे यासाठी या दोघे जैस्वाल दाम्पत्यचा अनुक्रमे रु. 24214/- व रु. 32760/- हा कपंनीने नाकारला होता. विमा कंपनीच्या या मनमानी व्यवहारा विरुध्द दोघांनी त्यांचे सहाय्यक पंकज झाडीवाले यांच्या मदतीने जालना येथील जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाकडे अॅड अरविंद एम. जातोडे (मो. 8999245567) यांच्या मार्फत धाव घेतली. त्यांनी विमा कपंनी विरुद्ध तक्रार दाखल केली असता दोघांचा अर्ज सूनावणी अंती जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाने अनुक्रमे रु. 24414 व रु. 50677 रुपयांनी तसेच प्रत्येकी 10,000/- खर्चासह मंजूर केला. या प्रकरणात विमा कंपनीला आयोगाचा दणका बसून शेवटी दोन्ही पक्षकारांना न्याय मिळाला. सदरचे सर्व कामकाज हे अॅड. ए. एम. जातोडे यांनी पाहीले होते.


















