सोलापूर : अज्ञात कारणावरून एका 56 वर्षीय महिलेने घरातील किचन रूम मधील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रेल्वे लाईन भागातील आरंभ अपार्टमेंटमध्ये आज
रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
जयश्री औदुंबर ठोकळ (वय 56 वर्ष , आरंभ अपार्टमेंट , सोलापूर ,मूळ रा. वडगोडगाव, ता. बार्शी ,) असे त्या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
रविवार पहाटेच्या सुमारास जयश्री ठोकळ यांनी किचन रूम मध्ये गळफास घेतला असल्याचे घरच्यांना आढळून आले.त्यांनी ही माहिती सदर बाजार पोलिसांना दिली असता पोलीस हवालदार एस एम मोरे यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरविला व येथील शासकीय रुग्णालयात पहाटे साडेपाच वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .
Post Views: 11