सोलापूर : अज्ञात कारणातून एका 39 वर्षीय माझी तलाठ्याने राहत्या घराच्या खिडकीला पाण्याच्या पाईपने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर रोडवरील पापा रामनगरात आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली .
कपिलदेव ज्ञानदेव जाधव (वय 39 वर्ष, रा. पापाराम नगर, माशाळ वस्ती, सोलापूर) असे त्या मयत माझी तलाठ्याचे नाव आहे. आज सोमवारी सकाळी त्यांची पत्नी ही मुलीला शाळेला सोडण्यासाठी गेली असता इकडे पतीने घरामध्ये पाण्याच्या पाईपने स्वतःला गळफास लावून घेतला .ही घटना पत्नी बाहेरून आल्यावर तिच्या निदर्शनास पडली . ही खबर विजापूर नाका पोलिसांना समजताच हवालदार विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात सकाळी 11 वाजता दाखल केला.
Post Views: 7