सोलापूर : मदरसामध्ये अरबी शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुली बरोबर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी सोलापुरातील एका मौलाना विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद उमर मोहम्मद हुस्सेन रझवी (वय 53 वर्ष, रा. नई जिंदगी; मूळ रा. जि. बहराईच, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून त्यांची 10 वर्षांची मुलगी ही नई जिंदगीतील एका अरबी मदरसा येथे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात होती. मागील एक महिन्यापासून ते 31 मेच्या संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास आरोपी मौलाना मोहम्मद उमर हा इतर मुलांना लवकर सोडून पीडित मुलीला एकटीलाच मदरशामध्ये थांबवून ठेवत असे आणि तिच्याशी अश्लील , घाणेरडे कृत्य करीत असे. इतकेच नव्हेतर, आरोपी मौलवीने तिथे शिक्षणासाठी येणाऱ्या इतर मुलींनाही अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक राधिका केंद्रे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 6