सोलापूर – अज्ञात कारणावरून एका वीस वर्षीय तरुणाने घरातील लाकडीवाशाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एमआयडीसी भागातील नितीन नगरात रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता उघडकीस आली.
चांद अब्दुल अजीज शेख ( वय 20 वर्ष , राहणार नितीन नगर , एमआयडीसी सोलापूर ) असे त्या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत चांद शेख हा मजुरीने काम करायचा . रविवारी त्याच्या घरातील लोक कामावर गेले होते आणि तो घरात एकटाच असताना त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला . ही घटना संध्याकाळी साडेसात वाजता उघडकीस आली.ही माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार डी के डोके यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह इतरांच्या साह्याने खाली उतरून येथील शासकीय रुग्णालयात रात्री पावणे नऊ वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित
केले .मयत चांद शेख हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई , दोन बहीणी , एक भाऊ असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 7