बीजेपी पक्षाचा काम का केला म्हणून तरुणास लोखंडी रॉड व लाकडाने मारहाण
सोलापूर – बीजेपी पक्षाचा काम का केला या कारणावरून एका तरुणाला लोखंडी रॉड व लाकडांनी मारहाण करण्यात आल्याची घटना मोहोळ येथे आज मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली .
अकबर आलम फरास ( वय 36 वर्ष , रा. मोहोळ ) असे त्या मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून तो आज दुपारी घरा जवळ असताना त्याला जिब्राईल बाबाजान शेख , अक्रम शेख , इमाम शेख , बिलाल शेख व इतर दोघा जणांनी मिळून मारहाण केली . यात सर्व अंगाला मुकामार लागल्याने त्याला मोहोळच्या आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून येथील शासकीय रुग्णालयात तो स्वतः दुपारी दाखल झाला.
एकुरगे येथे पत्नी व मुलाकडून एकास मारहाण
सोलापूर – घरगुती वादातून एका व्यक्तीला त्याची पत्नी व मुलाने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील एकुरगे गावात आज मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली .
भुजंग विष्णू साठे ( वय 58 वर्ष राहणार एकुरगे ) असे त्या मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .आज सकाळी घरामध्ये घरगुती वादातून त्यांना मुलगा नामदेव साठे व बायकोने मिळून लाथा बुक्क्याने मारहाण केली . यात सर्व अंगाला मुकामार लागल्याने त्यांना मोहोळच्या आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात ते स्वतः दुपारी दाखल झाले .
चंद्रभागा नदीकाठी पैशाच्या कारणावरून वृद्धाला उसाने मारहाण
सोलापूर – पैशाच्या कारणावरून एका वृद्ध इसमाला उसाने मारहाण करण्यात आल्याची घटना पंढरपुरात चंद्रभागा नदीकाठी सोमवारी सकाळी घडली .
आसाराम रामजी भार्गजे ( वय 69 वर्ष , रा . वेळामांडवा , ता पैठण , जि.संभाजीनगर) असे त्या मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे .सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते चंद्रभागा नदीकाठी असताना त्यांना एका अज्ञात इसमाने उसाने मारहाण केली . सर्व अंगाला मार लागल्याने त्यांना पंढरपूरच्या आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात आज दुपारी ते स्वतः दाखल झाले .
Post Views: 9