Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पिंपळगावमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा 

तरुण भारतbyतरुण भारत
June 3, 2026
in west maharashtra
0
पिंपळगावमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा 
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बाल वयातील मुलांना वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याचे काम जन्मभूमी प्रतिष्ठानने केले आहे. प्रत्येक गावाच्या विकासासाठी जन्मभूमी प्रतिष्ठानसारख्या माध्यमांची समाजाला गरज आहे, असे मत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी व्यक्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दत्तक घेतलेल्या धस पिंपळगावमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जन्मभूमी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या बाल व कुमारवयीन मुलांसाठीच्या वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ व जयंती सोहळ्यानिमित्त त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध व्याख्याते विशाल गरड, भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे, सरपंच तुळशीराम वायकर तसेच जन्मभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब धस, मा. सरपंच ज्ञानेश्वर भालेकर, नाना पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन सचिन धस, माजी सैनिक शरद जगदाळे, शितल राजमाने, विश्वजीत ठोंगे, मगनदास लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन झाल्यानंतर गावातील स्पर्धेतील मुलांच्या भाषणानंतर अंजना कृष्णा म्हणाल्या, दहा-बारा वर्षांची मुले गावातील व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलताना पाहिली. या मुलांना स्वतःला घडवायचे ही जाणीव मला त्यांच्या भाषणात दिसली. अशा छोट्या गावांमध्ये मुलांना एवढे मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले आहे. गावातील सर्व कुटुंबे एकत्र करुन त्यांच्यासमोर विचार मंथन घडून आणण्याचे काम या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून झाले आहे.
 यावेळी अंजना कृष्णा व मान्यवरांच्या हस्ते पहिली ते चौथी या वयोगटात सहभागी सर्व स्पर्धकांना प्रत्येकी ३०१ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच पाचवी ते सातवी मध्यम गटात प्रथम क्रमांक तेजस्वी हुंबे हिला तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले. द्वितीय क्र. समृद्धी मुळे या विद्यार्थिनीला २०००/- रु. व सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्र. विजेते सार्थक मुळे या विद्यार्थ्याला रु. १०००/- व सन्मानचिन्ह देण्यात आले. त्याचप्रमाणे आठवी ते दहावी मोठ्या गटातील प्रथम क्र. विजेती नम्रता बनसोडे या विद्यार्थिनीला रु. ३०००/- व सन्मानचिन्ह तसेच द्वितीय क्र. विजेता  नागनाथ वाघमोडे या स्पर्धकाला रु.२०००/- व सन्मानचिन्ह व तृतीय क्र. विजेती भक्ती पाटील या विद्यार्थिनीला रु.१०००/- व सन्माचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काकासाहेब मुळे, शितल राजमाने, अविनाश पाटील यांनी काम पाहिले.
 यावेळी व्याख्याते विशाल गरड यांनी आयपीएससारख्या अधिकारी या कार्यक्रमाला गावामध्ये येऊन मुलांना प्रोत्साहन देतात ही किमया जन्मभूमी प्रतिष्ठानने घडवली आहे, वक्तृत्व स्पर्धांसारखे उपक्रम शाळकरी मुलांना बालवयापासूनच गरजेचे असून यातूनच उद्याचा आयपीएस घडणार आहे. युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. गावाला नवी दिशा देणाऱ्या विचारांच्या मागे गावकऱ्यांनी उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. यातूनच गावाचे भले होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संयोजकाच्यावतीने सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव स्वप्निल धस यांनी केले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब पाटील, संचालक वैभव जगदाळे, प्रवक्ते सुरत चंदनशिवे, धनु वाघमोडे, दादा कसबे, राहुल धस, महादेव मस्तूद, समाधान पवार, बापूराव लवटे आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 29
Previous Post

तरुणास लोखंडी रॉड व लाकडाने मारहाण; पत्नी व मुलाकडून एकास मारहाण

Next Post

सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रा. अतुल भावठणकर यांचा सत्कार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रा. अतुल भावठणकर यांचा सत्कार 

सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रा. अतुल भावठणकर यांचा सत्कार 

ताज्या बातम्या

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

July 22, 2026
बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

July 22, 2026

बार्शी तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न; तरुणावर पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल

July 22, 2026

भव्य शालेय दिंडी व विठ्ठल रुख्मिणी वेशभूषा स्पर्धा २०२६ #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991838

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!