
सोलापूर – जागतिक पर्यावरण दिन अभियानाच्या अनुषंगाने आज कार्मिक विभाग व यांत्रिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डीआरएम कार्यालयाजवळील बाल विकास मंदिर, सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा विषय “हवामान बदल” हा होता. या स्पर्धेत सुमारे ८५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि पर्यावरण संवर्धन, शाश्वत जीवनशैली तसेच हवामान बदलाचे परिणाम यांवर आधारित आकर्षक चित्रे सादर केली.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे व निसर्गाप्रती जबाबदारीची भावना विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सहभागाचा गौरव करण्यासाठी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तत्काळ भेटवस्तू देण्यात आल्या.
ही चित्रकला स्पर्धा वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, सोलापूर आणि वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. कार्यक्रमाचे समन्वयन विपिन कुमार सिंह, रामलाल प्यासे, जितेंद्र वाघमारे, महावीर निमानी, अरविंद खडाखडे, शिल्पा ढेपले, भिमशा मस्के मुख्य कर्मचारी व कल्याण निरीक्षक, सोलापूर यांनी केले. रेल्वेने घेतलेल्या ड्रॉईंग कॉम्पिटिशन मध्ये प्रवीण तळे जी यांची उपस्थिती.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्जनशील माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात यश आले.



















