महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीच्या माध्यमातून रमाई आवास घरकुल योजनेतील सुमारे १३ लाभार्थ्यांचे प्रलंबीत असतेते हप्ते त्वरीत मिळावेत या लाभर्थ्यांनी नियमा प्रमाणे झलेल्या बांधकामाची सर्व कागदपत्रे नगरपंचायतीकडे सुपूर्त करून बराच कालावधी लोटला आहे परंतु अद्याप पर्यंत या लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते मिळालेले नसल्यामुळे त्यांना पुढील बांधकाम करणे अशक्य झाले आहे . त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते त्वरित देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन महाळुंग आरपीआयच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आलेआहे.
आरपीआय चे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते सुधीर भोसले यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले .
या प्रसंगी युवा नेते राजाभाऊ शिंदे, हनुमंत भोसले, आनंद केंगार, राहुल भोसले, शंकर चव्हाण, आनंद भोसले, भीमराव आठवले, कुलकर्णी काका, संजय चव्हाण, हरिदास सुतार, विठ्ठल चव्हाण, सनी सरतापे व लाभार्थी उपस्थित होते.
निवेदनात प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यातआला आहे .
Post Views: 5