सोलापूर : सेंट्रिंगचे काम करणाऱ्या एका पतीने पत्नीला चारित्र्याबाबत सल्ला देणारा व्हिडीओ बनवत राहत्या घरात सिलिंग फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना विजापूर नाका परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टी वसाहतीत मंगळवारी रात्री साडेआठ वाजता उघडकीस आली .
जाकीर अब्दुल रजाक पटेल (वय ३८वर्ष , रा. इंदिरा नगर झोपडपट्टी ,सोलापूर ) असे त्या मयत पतीचे नाव आहे.
मंगळवारी रात्री जाकिर याने गळफास घेतला असल्याचे निदर्शनास पडले . ही बाब नातेवाईकांना कळाल्यानंतर त्यांनी खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, मृत जाकीर यांचे पत्नीसोबत सकाळी वाद झाले होते. या वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी जाकिरने जवळपास ६ मिनिटांचा व्हिडीओ बनवला आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. ही घटना कळताच नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार रस्त्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहेत.
Post Views: 5