अकलूज – अन्न आणी औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी माळशिरस तालुक्यात कारवाई करण्याचा धडाका लावला असून मंगळवारी
सकाळी ग्राहकाकडून बोहनी होण्याची वाट पाहत बसलेल्या येथील एका पानपट्टीवर धडक कारवाई करत मावा बनवण्याचा सुमारे दोन लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
अकलूज पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाबाचा मावा या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे व पथकाने ही धाड टाकून जुने पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या बाबा पान शॉप येथून गुटखा, मावा, पानमसाला व सुगंधित तंबाखू यांसारखे प्रतिबंधित असलेल्या अन्न पदार्थांचा सुमारे १ लाख ९१ हजार रुपये किमतीचा साठा, मावा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन इलेक्ट्रिक मशीन जप्त करून दोन दुकान गाळे सील केले आहेत.
सुरक्षित व निर्भेळ अन्न पदार्थांचा पुरवठा होण्याच्या दृष्टिने अन्न सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतूरकर व अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी केले आहे.
दुकान मालक हर्षद शिवाजी होनप व तानाजी शिवाजी भोसले यांना अटक केली आहे
Post Views: 9