सोलापूर – महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी आ.सत्यजित तांबे यांच्या सोबत ग्रंथालय प्रलंबित मागण्या बाबत चर्चा केली होती त्यावेळी आ.सत्यजित तांबे यांनी तातडीने मुंबईकडे यावे असे सांगितले प्रश्न सुटला नाही त्यासाठी आपण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत निवेदन देऊन चर्चा करू तातडीने निर्णय घेण्यात यावेत यासाठी आ.सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे, जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश पाटील,सागर भगुरे आदी शिष्टमंडळाला सोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी लवकर निर्णय घेतले जातील असे सांगितले सर्व मागण्या संदर्भात मंत्रीमहोदय यांनी व्यवस्थितपणे उत्तर दिले यावरून शिष्टमंडळाला खात्री पटली असल्याचे सदाशिव बेडगे यांनी सांगितले. ग्रंथालय टिकले पाहिजेत कर्मचारी जगला पाहिजे यासाठी अहोरात्र सदाशिव बेडगे प्रयत्न करीत असल्याचे काही कर्मचारी बोलू लागले आहेत आज ग्रंथालय व कर्मचारी यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी अवस्था आहे शासनाने तातडीने निर्णय घेतले पाहिजेत या मागण्या फक्त महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सदाशिव बेडगे म्हणाले
मागण्या……
१)४०% अनुदान वाढीसाठी कॅबिनेट बैठकीत मंजुरी देऊन शासन निर्णयाचा आदेश तातडीने काढण्यात यावा.
२) ग्रंथालय अधिनियम १९६७ मध्ये काल सुसंगत सुधारणा करण्यात यावी. ग्रंथालय कर्मचारी यांचे काम सहा तास ऐवजी आठ तास करण्यात यावे.
३) ग्रंथालय अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून सार्वजनिक ग्रंथालयांतील कर्मचारी यांना किमान वेतन दरमहा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
४) ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात यावी.
५) केंद्र सरकारने दिलेले ४७० कोटी रुपये ग्रंथालयान समान वाटप करून ग्रंथालयाच्या खात्यात जमा करावे
६) सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे यासाठी निवृत्तीवेतन देण्यात यावे.
७) ग्रंथालयचा दर्जा/वर्ग बदल / नवीन ग्रंथालय मान्यता तातडीने आदेश काढण्यात यावा.