पंढरपूर – श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या कार्यकारणीची बैठक राष्ट्रीयअध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथे पार पडली असल्याची माहिती सचिव रुपेश खांडके यांनी दिली.
दरम्यान बैठकीमध्ये श्री संत नामदेव महाराज स्मारकाच्या भूमिपूजना विषयी चर्चा करण्यात आली. तसेच श्री संत नामदेव महाराज आर्थिकविकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणामध्ये समाज बंधू-भगिनींना होत असलेल्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात आली. संबंधित विभागातील अधिकार्यांना अध्यक्ष अॅड.महेश ढवळे यांनीसूचना करून अडचणी तात्काळ दूर करण्याची सूचना केली. तसेच समाजाच्या विविध विषययावरचर्चा करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.
बैठकीस सचिव रुपेश खांडके, उपाध्यक्षधनंजय गोंदकर, नंदकुमार कोसबतवार, प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे, कोषाध्यक्षअनिल गचके, प्रमोद शिंपी, हर्षराज कपडेकर, अॅड. सागरमांढरे, खेमराज नामा, महिलाप्रदेशाध्यक्षा रेखा मुळतकर, पूजा वादवने, मंजिरी कपडेकर यांच्यासह एकसंघाचे सर्व कार्यकारी सदस्यउपस्थित होते.
Post Views: 3