सोलापूर – टिकेकरवाडी यार्डातील आधुनिकीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या ‘प्री-नॉन-इंटर लॉकिंग’ आणि ‘नॉन-इंटर लॉकिंग’ कामामुळे, मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग दिनांक ०५.०६.२०२६ ते १०.०६.२०२६ या कालावधीत ‘ट्रॅफिक ब्लॉक’ (रेल्वे वाहतूक खंडित) घेण्यात येणार आहे.
ब्लॉकमुळे सोलापूर विभागातील स्थानकांमार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या संचलनावर वेळेवर परिणाम होणार आहे. सोलापूर-हासन एक्सप्रेस दी. 05.06.2026 रोजी सुरू होणारी 15 मिनिटे नियंत्रित केली जाईल. बागलकोट-म्हैसूर बसव एक्सप्रेस दी. 05.06.2026 रोजी सुरू होणारी 10 मिनिटे नियंत्रित केली जाईल. कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस दी. 5, 6, 8 आणि 09.06.2026 रोजी सुरू होणारी 45 मिनिटे नियंत्रित केली जाईल. भुवनेश्वर-CSMT मुंबई एक्सप्रेस दी. 5, 6, 8 आणि 09.06.2026 रोजी सुरू होणारी 20 मिनिटे नियंत्रित केली जाईल. LTT मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेस दी. 08.06.2026 रोजी सुरू होणारी 1 तास 40 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
– गाडी क्रमांक 01465 सोलापूर-कलबुर्गी स्पेशल (दिनांक 08.06.2026 रोजी सुरू होणारी) 25 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
रेल्वे गाड्यांचा मार्ग नमूद केलेल्या मार्गांवरून वळवला जाणार आहे. यामध्ये विजापूर-रायचूर पॅसेंजर दी. 08.06.2026 आणि 10.06.2026 रोजी सुरू होणारी विजापूर-होटगी-वाडी मार्गे वळवली जाईल. होटगी-सोलापूर-होटगी दरम्यान सेवा उपलब्ध नसेल. रायचूर-विजापूर पॅसेंजर दी. 06.2026 रोजी सुरू होणारी आणि दी. 10.06.2026 रोजी ही गाडी वाडी-हॉटगी-विजापूर मार्गे वळवण्यात येईल हॉटगी-सोलापूर-हॉटगी दरम्यान कोणतीही सेवा उपलब्ध नसेल.
चौकट
रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
पंढरपूर-म्हैसूरू गोलघुमट एक्स्प्रेस JCO 06.2026 ही गाडी 2 तास 20 मिनिटे उशिरा, म्हणजेच 15:20 वाजता सोडण्यात येईल. CSMT मुंबई-KSR बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस JCO 06.2026 ही गाडी 2 तास 15 मिनिटे उशिरा, म्हणजेच 10:10 वाजता सोडण्यात येईल.
चौकट
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 01465 सोलापूर-कलबुर्गी स्पेशल 10.06.2026 ही गाडी रद्द राहील.
गाडी क्रमांक 01466 कलबुर्गी-सोलापूर स्पेशल 10.06.2026 ही गाडी रद्द राहील.




















