सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी १२ ते १४ जून २०२६ या तीन दिवसात रेल्वे मैदान, सोलापूर येथे ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण गुरुवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात दिमाखात पार पडले.
यावेळी सोलापूर श्रमिक पत्रावर संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापुरात होत असलेल्या ‘लोकनाथ’ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदविला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘लोकनाथ’ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असल्याचे काळजे यांनी सांगितले. यावेळी सोलापूर सेमी पत्रा संघ व डिजिटल मीडियाचे सदस्य व खेळाडू उपस्थित होते.