पिलीव – महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या सत्तेवर असणाऱ्या महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचे आश्वासन दिले होते.त्या दृष्टीने सरकारने सध्या पाऊल उचलले आहे .सरकारने 31 मार्च 2019 ते मार्च 2025 पर्यंत घेतलेले व 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या खातेदारांना दोन लाखापर्यंतची कर्ज माफी देण्यात येणार आहे. तर दोन लाखाच्या वर असणारी रक्कम शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत भरावयाची आहे .सदरची रक्कम भरल्याशिवाय त्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळणार नाही .सोलापूर जिल्ह्य़ात सध्य परिस्थिती नियमीत कर्ज भरणारयांची संख्या मोठी आहे.तर राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी सध्याच्या आकडेवारीनुसार दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणारांची संख्या आठ हजार तर प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ जवळपास 85 हजार शेतकरयांना होणार आहे.सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व सोसायटया यांच्याकडील माहीतीच उपलब्ध आहे .इतर बँकांची माहीती अद्यापपर्यंत उपलब्ध नाही .माळशिरस तालुक्यात निकषात 1109 तर नियमीतपणे कर्ज भरणारे 17689 एवढे खातेदार आहेत.माञ इतर सर्व बँकांची माहीती मिळाल्यानंतर ही आकडेवारी बदलेल. पण सध्या शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीची संपुर्ण प्रकिया समोर आली आहे .सरकारने 30 जूनपूर्वी कर्ज माफी करणार असल्याचे सांगीतले होते.माञ कृषीमंञी दत्तात्रय भरणे यांनी 31 मे रोजी चौडी येथील अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात दहाच दिवसात शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष सध्या केवळ आणी केवळ कर्ज माफीकडे लागले आहे .पण याची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार. तर या कर्ज माफी संबंधित शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखालील समीती नेमली आहे .ही समिती कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व रूपरेषा स्पष्ट करणार आहे .तर या कर्ज माफीत कर्ज न भरणारांना मोठा म्हणजे दोन लाखाचा लाभ तर व्याजाने काढुन किंवा उसनवारी करुन नियमीत कर्ज भरणारयांना माञ फक्त पन्नास हजारांचा लाभ यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे .पण या निकषात शासन काही बदल करेल असे अजिबात वाटत नाही .शासनाने तसा आदेश काढला आहे तसेच मंञीमंडळानेही याला अंतीम मंजुरी दिली आहे .काही असो पण जो काही असेल तो लाभ कधी मिळतोय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .




















