सोलापूर – चालताना तोल जाऊन पडलेल्या मोहोळच्या तरुणाचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी रात्री दहा वाजता मृत्यू झाला .
अनिल सुदाम शिंदे (वय 27 वर्ष , रा. मोहोळ ) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे . तो एक जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मोहोळ रेल्वे स्टेशन जवळून चालत जात असताना तोल जाऊन खाली पडला होता . यात डोक्याला मार लागल्याने त्याला एका खाजगी दवाखान्यात उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात संदीप शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी बेशद्ध अवस्थेत दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री दहा वाजता मृत्यू झाला.
Post Views: 9