सोलापूर : हजरत ख्वाजा वजीरबाशा चिश्ती, रहेमतुल्लाहा आल ए दर्गाहच्या उरूसास बुधवार दि. १० जून पासून प्रारंभ होत असल्याची माहिती हजरत ख्वाजा समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष सैफी सज्जाद नशीन म. हारून पटेल यांनी दिली.
यामध्ये बुधवारी १० जून रोजी सायंकाळी ७ वाजता जुलुस निघणार आहे. संदल शरीफ मार्कंडेय मंदिर येथून निघून अल आमीन नगर, स्वागत नगर मार्गे अष्टविनायक नगर जवळच्या दर्गाह शरीफला येणार आहे.या ठिकाणी संदल मध्ये कार्यक्रम सादर करण्यात येईल. धार्मिक विधी पार पडतील. गुरूवार ११ जून रोजी उरूस निमीत्त सायंकाळी ७ वाजता नियाजे लंगर (प्रसाद) वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक उरुसाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव म.शफिक पटेल यांनी केले आहे.
Post Views: 15