अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विस्तार भक्ताभिमुख होत आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने गोवा येथील नानोरा बिचोलिम गट नं.४८७/६ या जागेत नियोजित श्री दत्त मंदिर जीर्णोद्दार भूमिपूजन कार्यक्रम मंगळवार दि.९ जुन २०२६ रोजी सायं.५ वा. संपन्न होणार आहे.
गोवा येथे बहुसंख्येने श्री स्वामी समर्थांचे भक्त असून ते श्री स्वामी अन्नछत्र मंडळाशी जोडलेले आहेत. गोवा येथील नानोरा बिचोलिम येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या जागेत श्री दत्त मंदिर होते. याचा जीर्णोद्दार व्हावा म्हणून तेथील स्वामीभक्तांची मागणी होती. ती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून पूर्ण होत आहे.
हा कार्यक्रम गोवा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री रोहन खवटे, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, म्हापसा गोवाचे माजी महापौर रोहन कवळेकर, मुंबईचे माजी नगरसेवक विजय तांडेल, उद्योगपती मनोज गंगावणे,कल्याण, तुकाराम शेठ म्हात्रे, नगरसेवक, उद्योगपती, बदलापूर, लक्ष्मण पालेकर, उद्योगपती, गोवा, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी दिली आहे.
Post Views: 40