Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in solapur
0
आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : अनुसूचित जाती-जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी राज्य शासनाने तातडीने करावी, अन्यथा जुलै २०२६ मध्ये मुंबईतील आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
         सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय निर्धार बैठक सोलापुरात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख नेत्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, उत्तमप्रकाश खंदारे, माजी राज्यमंत्री दिलीपराव कांबळे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, आ. सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव,
सुरेश पाटोळे यांच्यासह नेते, पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली.
          सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्रात अद्याप झालेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
नेत्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी या दिशेने पावले उचलली असताना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाने १६ मार्च २०२६ रोजी अहवाल सादर केला असतानाही त्यावर कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. अनुसूचित जातींमधील अनेक घटकांना गेल्या ७५ वर्षांत आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळाला नसल्याचा दावा करत, आरक्षणाचा लाभ वंचित राहिलेल्या ५७ जातींना न्याय मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे मत मांडले.
               सन १९१९ ला ब्रिटिश सरकारने अनुसूचित जाती जमातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झिरपणाच्या सिद्धांताने आरक्षण पहिल्यांदा दिले त्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी दिले आणि स्वातंत्र्यानंतर संविधानाने महाराष्ट्रातल्या ५९ जातींना १३ टक्के आरक्षण दिले. संविधानाचे कलम ३४१/१६ (४) मध्ये नमूद केल्याप्रमाणे गेल्या ७५ वर्षात झिरपण्याच्या सिद्धांताने अनुसूचित जाती आरक्षण महाराष्ट्रातल्या ५९ जातीपर्यंत पोहोचले नाही तर ते केवळ दोन ते तीन जातीमध्ये हे आरक्षण घुटमळून डंप झाले आहे.बार्टी, आर्टी, अनुसूचित जाती आयोग महिला आयोग यांच्या संयुक्त चौकशी समितीच्या माध्यमातून ७५ वर्षांमध्ये अनुसूचित जातीच्या ५९ जाती पर्यंत किती जातीला लाभ पोहोचला याची जात निहाय पद‌निहाय यादीची श्वेतपत्रिका सरकारने काढावी.बार्टीची स्थापना झाल्यापासून आजतागायत अनुसूचित जातीच्या किती जात घटकापर्यंत बार्टीच्या शिक्षण प्रशिक्षण स्वावलंबन व इतर अशा योजना ५९ जातींपैकी किती जातीपर्यंत पोहोचल्या त्या लाभार्थ्यांची जात निहाय यादीची श्वेतपत्रिका बार्टीने काढण्याची मागणी केली.
         राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त २६ जून २०२६ पर्यंत राज्य शासनाने उपवर्गीकरणाबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल तसेच राज्यभर मोर्चे, हलगीनाद आंदोलन, जिल्हास्तरीय निदर्शने करण्यात येईल, असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला.
           या पत्रकार परिषदेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी व राज्यातील मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 42
Previous Post

उपमहापौरांच्या हस्तक्षेपामुळे निर्मिती विहारमधील २५ कडुलिंब वृक्षांची कत्तल टळली

Next Post

राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड ऑनलाईन प्रश्नमंजुषा २१ जूनला 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड ऑनलाईन प्रश्नमंजुषा २१ जूनला 

ताज्या बातम्या

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1030274

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!