सोलापूर – महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, भारत सरकार आय.एस. ओ.मानांकन प्राप्त राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र राज्य १५ जून पासून पूर्ण राज्यभरामध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश घ्यावा असे आव्हान राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षा मुख्य प्रवर्तक, सदस्य पुणे बोर्ड,सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य,संस्थापक चेअरमन स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर प्रा.डॉ बापूसाहेब आडसुळ यांनी केले आहे.
सदर परीक्षेसाठी राज्यातून दोन ते तीन लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील, ही परीक्षा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र असतील, सदर प्रज्ञाशोध परीक्षेसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग पूर्ण राज्यभरामध्ये कार्यरत आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सदर पुस्तिकेचे प्रकाशन होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेचे मुख्य प्रवर्तक प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांनी दिली आहे.
Post Views: 14