मोडनिंब – (ता. माढा) येथे गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरण वर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना काही वेळी दुपारच्या वेळी वीज नसल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तर रात्री वीज खंडित होत असल्याने झोपेचा खोळंबा होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचे उकाड्याने हाल होत आहेत. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. अचानक वीज ये-जा होत असल्याने घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. अचानक वीज ये-जा होत असल्याने घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
शेटफळ 33 kv लाईनची कंडक्टर तुटल्यामुळे तो चेंज करण्यासाठी थोडा वेळ सप्लाय बंद होता.. तसेच वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी तारा तुटल्यामुळे व पोल मोडल्यामुळे ते जोडण्यासाठी सप्लाय काही काळ बंद होता.. सध्या सर्व लाईन सुरळीत केलेल्या आहेत. त्यामुळे मोडनिंब येथे गावठाण लाईन चा प्रॉब्लेम येणार नाही.
संतोष मोहन सूळ
सहायक अभियंता
शाखा मोडनिंब
उन्हाळ्याच्या दिवसांत पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असताना शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित होत आहे. शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. रात्रभर जागून पाणी देण्याची वेळ येते. तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा.
आप्पा पाटील
युवा शेतकरी



















