सांगोला – कोणार्क, एल टी टी एक्सप्रेसला कुर्डूवाडी जंक्शन येथे थांबा मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर (मुंबई) यांच्याकडे करण्यात आली आहे.
इंद्रायणी/हुतात्मा एक्सप्रेसच्या पाठीमागे विशाखापट्टणम एक्सप्रेस असते. सदर गाडीला कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन थांबा दिल्यास सांगोला, पंढरपूरकडे व लातूरकडे जाणाऱ्या प्रवासी यांची सोय होऊ शकते. तसेच विशाखापट्टणम, कोणार्क या रेल्वेस कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर जाता-येता थांबा दिल्यास सोलापूर जिह्यातील नागरिकांची जगन्नाथ पुरी येथे जाण्याकरिता प्रवाशांची सोय होईल. रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार व सर्वे करून तात्काळ कुर्डूवाडी जंक्शन थांबा मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन खा.प्रा.ज्योती वाघमारे यांना दिले असता थांब्याबाबत रेल्वे बोर्ड, मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 12