बार्शी – दि. १ मे १९९८ रोजी मौजे पिंपळगाव (धस) येथे गणपत धस व दशरथ देवकते यांना हनुमंत हरी धस, सुरेश विठ्ठल धस, भाऊसाहेव गौतम कांबळे, धनाजी प्रभु वाघमोडे, बाळु शिवदास धस, दत्तात्रय विठ्ठल ऊर्फ शिवदास धस, बलभीम वसंत वाघमोडे वगैरे लोकांनी राजकीय वैमन्यासून मारहाण केल्याने त्यांचेविरूध्द बार्शी येथील मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात भादंवि. कलम १४३, १४७, १४८, ३२३, ३२४, ३२५, ३२६ व वॉम्बे पोलीस ॲक्ट कलम १३५ प्रमाणे दि. १९ डिसेंबर २०१८ रोजी मे. राऊत मॅडम यांनी दोषी ठरवून सर्व कलमांखाली ६ वर्ष शिक्षा व दंड असे आदेश केले होते. सदर शिक्षेविरोधात आरोपींनी अपील दाखल केले होते. सदर अपीलामध्ये आरोपींचे वकील ॲड. धनंजय माने व ॲड. आर. आर. पाटील तर मूळ फिर्यादी व सरकारी पक्षातर्फे मे. कोर्टाचे तसेच जिल्हा सरकारी वकील यांचे परवानगीने सरकारी पक्षातर्फे ॲड. एम. पी. धस व ॲड. डी. एम. धस यांची काम चालवले. सदरकामी सरकारी पक्षातर्फे ॲड. एम. पी. धस व ॲड. डी. एम. धस यांनी केलेला युक्तीवाद व मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर झालेले ११ साक्षीदार व सरकारी पक्षाने दिलेले पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा न्यायालय, बार्शी येथील न्यायाधिश श्री. पी. डी. सुभेदार साहेब यांनी मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बार्शी यांनी दिलेले शिक्षा व दंड कायम ठेवून हनुमंत हरी धस, सुरेश विठ्ठल धस, भाऊसाहेब गौतम कांबळे, धनाजी प्रभु वाघमोडे, बाळू शिवदास धस, दत्तात्रय विठ्ठल ऊर्फ शिवदास धस, बलभीम वसंत वाघमोडे यांचे अपील रद्द केले. सदर केस सुमारे २८ वर्षानंतर निकाली झाल्यानंतर पिडीतांना न्याय मिळालेला आहे.
Post Views: 11