सोलापूर – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या रमेश धोडमणी याने राष्ट्रीय गतका स्पर्धेत कांस्य पदक संपादिले. कोटा, राजस्थान येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ गतका स्पर्धेत सिंगल सोटी प्रकारात त्याने ही कामगिरी केली. तो
छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचा विद्यार्थी आहे. रमेशला प्रा. संतोष गवळी, डॉ. सुभाष मारकड, डॉ. धनंजय देशमुख आणि प्रा. विशाल गाडेकर यांचे मार्गदर्शन केले. त्याचा
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी
प्र. कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा, परीक्षा नियंत्रक डॉ.श्रीकांत अंधारे, क्रीडा संचालक तथा प्रभारी कुलसचिव डॉ.अतुल लकडे, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे उपस्थित होते.
Post Views: 36