सोलापूर – येथील ‘चेतक स्केटिंग क्लब’च्या स्केटिंग स्पर्धेत अवघ्या साडेचार वर्षांच्या स्मार्त घायाळ या चिमुरड्याने साध्या स्केट्सवर अप्रतिम कौशल्य दाखवत ६ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
क्लब’च्या वतीने आयोजित ८४व्या ७५ दिवसीय स्केटिंग प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला. या शिबिरात सोलापूरसह परिसरातील अनेक गावांमधील मुला-मुलींनी स्केटिंगचे धडे गिरवले. या शिबिराचाच एक भाग म्हणून नुकतीच होम मैदानालगत स्केटिंग स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. एकूण ९ वेगवेगळ्या वयोगटात पार पडली.
शिबिरादरम्यान सर्व खेळाडूंना दिव्यकांत गांधी यांनी ‘स्पीड स्केटिंग’चे विशेष प्रशिक्षण दिले आणि स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले. या स्पर्धेचे परीक्षण दिव्यकांत यांच्यासह मयुर सोलनकर, जयदेव बाहेरमठ, प्रितेश गांधी आणि ध्रुवेश गांधी यांनी चोखपणे पार पाडले.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय): ६ वर्षांखालील गट: मुले: स्मार्त घायाळ, सार्थक खताळ, जैन अली शेख. मुली: उर्वी गांधी, प्रेक्षा शिंदे.
९ वर्षांखालील गट: मुले: सालीफ सुहेल इनामदार, अ. सत्तार शेख, अहद शेख.
मुली: अस्मायरा नदाफ, सिमराह इनामदार.
१२ वर्षांखालील गट: मुले: अहद शेख, अर्थव मोरे, निखिल उपळाइकर. मुली: अलेक्या सानम, उमेरा शेख, झकीया शेख.
१५ वर्षांखालील गट: मुले: श्लोक खताळ, अंशुक कांबळे. मुली: लतीका मोरे.
१९ वर्षांखालील गट: मुले: मयुर सोलनकर, जयदेव बाहेरमठ.





















