सोलापूर: सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १४ वर्षांखालील मुलांची क्रिकेट निवड चाचणी शनिवार, २० जून आणि रविवार, २१ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे.
या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूंची जन्म तारीख १ सप्टेंबर २०१२ किंवा त्यानंतरची असणे आवश्यक आहे. सर्व इच्छुक खेळाडूंनी चाचणीपूर्वी आपले खेळाडू रजिस्ट्रेशन पूर्ण करून निवड चाचणी फी भरणे बंधनकारक आहे. निवड चाचणीच्या दिवशी खेळाडूंना सकाळी ११ वाजेपूर्वी मैदानावर रिपोर्टिंग करावे लागेल. सकाळी ११ वाजेच्या आधी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंचीच निवड चाचणी घेतली जाईल, असे असोसिएशनने संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सो यांनी कळविली आहे. ही निवड प्रक्रिया चेअरमन राजेंद्र गोटे, सत्यजित जाधव, विक्रांत पवार, डॉ. ढेंबरे आणि राजू रंगम यांची समिती पार पाडणार आहे.
——




















