
सोलापूर- श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे ज्येष्ठ अधिक मासानिमित्त जगद्गुरु उत्सव, मार्ग हा मुक्तीचा ग्रंथ गजमहोत्सव, ईस्टलिंग महापूजा, महाराष्ट्रातील शिवकथाकार व शिव कीर्तनकार, शिवाचार्य यांना पुरस्कार वितरण व धर्मसभेची सांगता समारंभ सोलापुरातील श्री बृहन्मठ होटगी संस्था येथे आयोजित करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी बृहन्मठ होटगी संस्थेकडून करण्यात आली आहे. आज रविवार 14 जून रोजी दुपारी 4.00 वा श्री श्री श्री 1008 जगद्गुरु वीरसिंहासनाधीश्वर डॉ.प्रसन्न रेणुक वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्री रंभापुरी महापीठ, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु सधर्मसिंहासनाधीश्वर डॉ.सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्री उज्जैन महापीठ, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्री काशी ज्ञानपीठ, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री काशी ज्ञानपीठ यांचे रथोत्सव, ,1008 जलकुंभ सुवासिनी व ग्रंथदिंडी अनेक वाद्यासह भव्य मिरवणुकीने श्री बमलिंगेश्वर मठ, विष्णुपंत नगर, साक्षी गणपती, किसान नगर, गंगाधर नगर,राजीव नगर, लक्ष्मी मंदिर पासून श्री वीरतपस्वी मंदिर अक्कलकोट रोड येथे मिरवणूक संपन्न होणार आहे. त्यानंतर बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व महाराष्ट्र- कर्नाटकातील अनेक शिवाचार्यांच्या उपस्थितीत धर्मसभा आयोजित करण्यात आलेली असून धर्मसभेनंतर महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. सोमवार 15 जून रोजी सकाळी 7.00 वा.परमपूज्य श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्री काशी ज्ञानपीठ यांचे ईस्टलिंग महापूजा श्री वीरतपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिर येथे होत असून 1008 महिला व पुरुषांचे सामूहिक रुद्रपठण, सकाळी 11 वा.धर्मसभा व त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी अधिकमासामध्ये संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून जगद्गुरूंच्या आशीर्वादास पात्र व्हावे असे आवाहन होटगी मठाच्या वतीने करण्यात आलेलीआहे.