माळशिरस – पंढरपूर इस बावी स्वामी विवेकानंद नगर येथील 15 भाविक म्हसवड व गोंदवले येथे देवदर्शनाला येथे जाऊन येत असताना तांदळवाडी तालुका माळशिरस येथून सातारा पंढरपूर रोडवर जात असताना तांदुळवाडी कदम वस्ती येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रोड वरून लगत असलेल्या विहिरीमध्ये पडून त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत
अधिक वृत्त असे की रांजणी तालुका पंढरपूर येथील सागर चौगुले यांच्या पिकपअप नंबर एम एच 13 डिओ 63 35 या गाडीने पंधरा भाविकांना घेऊन सकाळी इसभावी येथून निघाले होते दोन्ही ठिकाणी देवदर्शन करून दुपारचे जेवण करून परतीच्या प्रवासाला सुरुवात करून ते पंढरपूर जवळ आले असता माळशिरस हद्दीमध्ये तांदुळवाडी गावाजवळ गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप गाडी 15 जणांसह विहिरीत पडले. ही घटना इरफान मुजावर, सौरभ कोळी ,स्वप्नील कदम यांनी पाहिली. लागलीच त्यांनी विहिरीत उड्या मारून तिघांनी अनेकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले यामध्ये मयत झालेले पूजा अमोल सातोरे ,ताई बावचे ,पूजा बालाजी बावचे ,अश्विनी संदीप बावचे सार्थक संदीप बावची, संस्कृती संदीप बावचे ,गणेश बालाजी बावचे व बालाजी बावचे यांचा लहान मुलगा मयत झाला आहे तर या घटनेमध्ये सात जण जखमी झालेले आहेत ते पुढील प्रमाणे सिद्धेश्वर पोपट जाधव, सागर चौगुले चालक ,अपूर्व अमोल सातोरे बालाजी बावचे संदीप बावचे हे जखमी झाले आहेत जखमींना पंढरपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एका जखमीला तांदुळवाडी येथे डॉक्टर मिले यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे हे करीत आहेत.
विहिरीला सुरक्षित कठडा नसल्याने अपघात.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीला सुरक्षा कठडा नसल्याने अपघात धडका असून यापूर्वी आठ दिवसापूर्वी गाडी दुसऱ्या विहिरीत गेली होती परंतु सुदैवाने मनुष्य हाणी झाली नव्हती.या अपघाताने विहिरीच्या सुरक्षा कठड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
घटना स्थळाला भेट
पालकमंत्री जयकुमार गोरे,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,खासदार प्रणिती शिंदे,आमदार उत्तमराव जानकर,आमदार अभिजित पाटील,माजी आमदार राम सातपुते.
जिल्हाधिकारी एस कार्तिकेन,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,प्रांताधिकारी विजया पांगारकर,तहसीलदार सुरेश शेजुळ
Post Views: 38