बार्शी – वखारिया विद्यालय उपळे दुमाला येथे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत काशीद सर यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. दयानंद रेवडकर सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास उपळे दुमाला गावचे सरपंच किरण महानवर, गटनेते मनोज बुरगुटे, उपसरपंच नितीन बुरगुटे, मार्केट कमिटीचे संचालक सचिन बुरगुटे, ग्रामपंचायत सदस्य किरण सोनवणे, धनाजी बाकले हे उपस्थित होते.
याप्रसंगी नवागताचे स्वागत नवीन पुस्तके, नवीन शालेय गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य मान्यवराच्या हस्ते देऊन करण्यात आले.
तसेच याप्रसंगी मागील शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद रेवडकर यांनी गुणवत्ता वाढण्यासाठी विविध उपक्रम घेणार आहेत हे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख लंकेश्वर सर यांनी केले होते.
कार्यक्रमास अनिल वैद्य, अतुल राठोड, मकरंद जगदाळे, दत्तात्रय राऊत, रेवणसिद्ध दुलंगे, यश पवार, मुजावर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नामदेव महाले यांनी केले.