अक्कलकोट – राजमाता जिजाबाई यांनी संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा, समाजहित आणि संस्कारासाठी समर्पित केले. त्यांनी मातृत्व, नेतृत्व, प्रशासन आणि राष्ट्रनिर्मिती या सर्व क्षेत्रांत आदर्श निर्माण केला. त्यांनी केलेल्या संस्कार मूल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच त्यांचे कार्य प्रेरणा स्तोत्र आहे असे प्रतिपादन मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने राजमाता जिजाबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, पर्यवेक्षक सिद्रामप्पा पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, इतिहासात जिजाबाईंना “राजमाता”, “स्वराज्यजननी” म्हणून गौरवले जाते. त्यांचे जीवन कार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी स्फूर्ती देणारे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा शितल फुटाणे यांनी केले आभार प्रा हर्षदा गायकवाड यांनी यावेळी प्रा शितल टिंगरे, प्रा जनाबाई चौधरी, शिवकुमार मठदेवरु उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
नवोदित विद्यार्थिनींकडून राजमाता जिजाबाईंना अभिवादन..
महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेण्यासाठी आलेल्या कुमारी राजश्री कोळी, ऐश्वर्या चांभार, भैरम्मा म्हेत्रे, ऐश्वर्या राठोड,तृप्ती घिवारे, अंबिका जमादार, रोहिणी बिराजदार, अमृता शेंडगे, राजश्री कोळी या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाबाईंच्या प्रतिमेस अभिवादन करून देश रक्षणाची प्रतिज्ञा केली.
फोटो ओळ
राजमाता जिजाबाईंच्या प्रतिमेस अभिवादन करताना महाविद्यालयातील विद्यार्थिनी व मान्यवर
Post Views: 23