Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समीर पाठक यांनी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या दंगलसदृश स्थितीवर केलेले प्रासंगिक….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 30, 2023
in solapur
0
समीर पाठक यांनी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या दंगलसदृश स्थितीवर केलेले प्रासंगिक….
0
SHARES
316
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजी नगर मधील कालची घटना ही शहराच्या औद्योगिक विकासाच्या परिघातून बघणे अत्यंत गरजेची अशी आहे . काल छत्रपती संभाजी नगर मध्ये काही दंगलखोरांनी थैमान घातला . शहरातील किराडपुरा परिसरात ही घटना घडली . हा परिसर संमिश्र अशा वस्तींचा परिसर आहे . परिसरात प्रभू श्री रामाचे जुने मंदिर आहे प्रतिवर्षी श्री राम नवमीच्या निमित्याने इथे मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येतात . या मंदिरातील आरतीनेच शहरातील रामनवमी च्या कार्यक्रमाला खऱ्याअर्थाने सुरुवात होते . काल रात्री काही भाविक तिथे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जमा झाले होते . काही दंगलखोरांनी रात्री साडे अकराच्या सुमारास तिथे धुडगूस घातला .

दगडफेक आणि मग जाळपोळीला सुरुवात केली या जाळ पोळी मध्ये पोलिसांचे वाहनही बळी पडले . पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश जरी आले असले तरी ही घटना बहुआयामी मानसिकता आणि त्यामागील वास्तविकता विशद करणारी आहे . प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रावर परिणाम करणारी आहे . ही बाब आता लक्षात घेणं जरुरी आहे .गेल्या एक महिन्यापासून शहराचे वातावरण अशांत आहे . यांची दखल घेत शहरातील औद्योगिक संघटनांनी एक पत्रकार परिषद काही दिवसांपूर्वी घेतली होती . शहरातील या अशांत वातावरणाचा दुष्परिणाम उद्योगांवर होऊ शकतो अशी शक्यता त्या पत्रकार परिषदेत उद्योजकांनी व्यक्त केली होती . विशेषतः करून जी – 20 च्या यशस्वी सादरीकरणानंतर शहरातील उद्योजकां मध्ये एक उत्साहाच , एक आशावादाचं एक आनंदाचं , एक अनुकूलतेच वातावरणनिर्माण झालं होतं मात्र काल च्या घटनेमुळे पुन्हा निराशाचे ढग दाटून आले आहेत की काय अशी शंका निर्माण होत आहे . उद्योजकांनी आयोजित पत्रकार परिषदेत याच दुष्परिणामा कडे लक्ष वेधले होते .

शहरात निर्माण होत चाललेली अशांत परिस्थिती ही जी – २० मुळे निर्माण झालेल्या अनुकूलतेवर दुष्परिणाम करणारी ठरू शकते अशी दाट शक्यता त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्योजकांनी व्यक्त केली होती कालच्या घटनेमुळे ती शक्यता अधिक दाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . कारण कोणताही बडा उद्योजक आपला उद्योग शहरात सुरू करण्यापूर्वी शहराच्या एकुण परिस्थितीचा आढावा घेतल्याशिवाय राहात नाही आणि तो आढावा घेताना हे अशांततेचे शहरातील चित्र त्यांच्या नजरेतून सुटणार नाही . आणि शहरात मोठे उद्योग येण्याची शक्यता कमी कमी होत जाणार आहे . गेल्या काही वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने शहरात ऑरिक सारखा बहुउपयोगी असा प्रकल्प उभारला जात आहे जो शहराच्या विकासाला सहाय्यभूत ठरणारा आहे शहरातील उद्योजकांना चालना देणारा आहे शहराकडे पाठ फिरवणाऱ्या बड्या उद्योजकांना आकर्षित करणारा आहे आणि अशा सर्व सकारात्मक बाबीत जी 20 चे सादरीकरण ही जमेचीबाजू आहे . असे सगळे उद्योगाला चालना देणारे योग जुळून येत असताना अशा दंगली या सगळ्यावर दुष्परिणाम करणाऱ्या ठरण्याची दाट शक्यताआहे . हीच भीती आज उद्योग जगतामध्ये निर्माण झाली आहे कोणत्याही शहराची आर्थिकचक्र हे उद्योजकांच्या प्रगतीवर अवलंबून असतात . हे साधं गणित आहे मात्र अश्या अशांत वातावरणामुळे औद्योगिक विकासाला गतिरोधक ठरणार आहे . ऐकीकडे केंद्र आणि राज्य सरकार शहराला औद्योगिक गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे अश्या घटना केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नावर पाणी फिरवत आहे . ८० च्या दशकात शहरातील उद्योग चक्र गतिमान होते .

या औद्योगिक विकासामुळे शहराची प्रगती होत होती . शहर झपाट्याने वाढत होत . मात्र आज शहरात निर्माण झालेली अस्थिरता औद्योगिक प्रगतीला बाधक ठरणारी आहे . मराठवाड्याची कृषी परिस्थिती सर्वश्रुत अशी आहे कधी दुष्काळाचा सामना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो तर कधी अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक हातातून जात . अशा प्रतिकूल कुटुंबातील अनेक युवक रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात पण शहरातील अशी अशांत व अस्थिर परिस्थिती उद्योजकाला कशी चालना देणार आणि अश्या बेरोजगार युवकांना कशी रोजगार मिळवून देणार हीच चिंता आज निर्माण झाली आहे . युवकांना रोजगार मिळाला नाहीतर बेरोजगारीच्या दुष्टचक्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही मग या दुष्टचक्राला कोण जबाबदार ? हा प्रश्न अंर्तमुख करणारा आहे . शहराची आजची औद्योगिक परिस्थिती पाहता शहरातील बडे उद्योजक शहरातून जाण्याच्या मानसिकते मध्ये आहेत .

अश्या अस्थिर वातावरणामुळे ती मानसिकता अधिक प्रबळ होण्याची शक्यता अधिक आहे . असे न घडो पण एक शक्यता जर असे घडले आणि शहरातील बडे उद्योजक शहरातून गेले तर शहरातील लघु उद्योजक आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारावर मोठा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शहरातील शांतेच , सलोख्याचे वातावरण किती गरजेचे आहे हे वेगळे सांगणे नको . शहरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची गरज आहे . असे सामुहिक प्रयत्नांना जर यश आले तर शहराला औद्योगिक गतवैभव प्राप्त होईल .

1980 च्या दशकात शहर औद्योगिक प्रगतीपथावर होत . त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने झाला होता . तोच विकास केंद्र आणि राज्य सरकारला अपेक्षित आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक विकासाचे ध्येय सरकारने निश्चित केले आहे . मात्र कालच्या घटना शहराच्या प्रतिमेला आणि प्रगतीला बाधक ठरत आहे . अश्या घटनाची पुनरावृत्ती होणार नाही ही मात्र सार्वत्रिक जवाबदारी आहे . ती नाकारून चालणार नाही . शहराच्या प्रगतीसाठी हे गरजेचे आहे.

Post Views: 193
Previous Post

राजकारणातून निवृत्त होण्याचा कुठलाही विचार नाही – नितीन गडकरी

Next Post

इंदापूर :- गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई, 18 लाखांच्या गुटख्यासह 24 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
इंदापूर :- गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई, 18 लाखांच्या गुटख्यासह 24 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत….

इंदापूर :- गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपवर कारवाई, 18 लाखांच्या गुटख्यासह 24 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत....

ताज्या बातम्या

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

June 20, 2026

शहरातील ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या – चंदनशिवे, सावंत, मोरे गुन्हे शाखेत

June 20, 2026
श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 20, 2026

शाळांवर अचानक तपासणी; गैरहजर शिक्षकांवर थेट कारवाई

June 20, 2026
मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

June 20, 2026

“विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 20, 2026
प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

June 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0925507

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697