सांगोला – विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी तालुक्यातील विविध गावांमधील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि खेड्यांतील जोड रस्त्यांच्या सुधारणेसाठी वापरला जाणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सदरचा निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केली होती.
शिरभावी-मांजरी-सावे-इमडेवाडी रस्ता, भोपसेवाडी-मानेवाडी रस्ता, घेरडी येथील मानेवस्ती ते ग्रामा १९० रस्ता, ढोलेमळा रस्ता ते संगेवाडी, इजिमा ५५ ते मेडशिंगी रस्ता, सोनंद येथील मासाळवस्ती ते आगलावेवाडी रस्ता, गौडवाडी-जुजारपूर-गुणाप्पाचीवाडी-वाळेखिंडी ते जि.हद्द रस्ता, हतीद ते ह.मंगेवाडी रस्ता, पाचेगांव बु. ते किडबिसरी रस्ता, कोळे ते बाणुरगड रस्ता, महुद ते हलदहीवडी येथील इजिमा ९१ रस्ता, रामा १२४ ते शिवणे म्हसोबा देवस्थान येथील प्र.१८२ रस्ता, शिवणे येथील घाडगेवस्ती ते हलदहिवडी रस्ता, वाकी घेरडी येथील निमग्रेवाडी ते कडलास रस्ता या कामांना प्रत्येकी ५० लाख असे एकूण ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.