बार्शी – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शी यांचेवतीने आणि मा.प्राचार्य व.न.इंगळे पुरस्कृत श्री शाहू महाराज साहित्य पुरस्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि.२६ जून रोजी मातृमंदिर, ढगे मळा बार्शी येथे सायंकाळी ५.३०वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बार्शी न.पा.च्या अध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले या भूषविणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वाती महाळंक , प्रसिद्ध निवेदिका आणि प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय साहित्य महामंडळ, पुणे या उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळा कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष, रमेश पाटील आणि दत्त शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय मंडळ बार्शीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीश सातपुते हे प्रमुख उपस्थितीत आहेत.
हा मानाचा शाहू साहित्य पुरस्कार जेष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक श्री. मुकुंदराज कुलकर्णी यांना आणि जेष्ठ साहित्यिका डॉ.स्मिता पाटील (मोहोळ) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच बार्शी येथील जेष्ठ साहित्यिक हरिभाऊ कोळेकर व जेष्ठ साहित्यिका सौ. सुमन चंद्रशेखर यांना विशेष साहित्यिक सेवेबद्दल कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त साहित्य प्रेमीनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन म.सा.प. बार्शी शाखेचे अध्यक्ष पां.न. निपाणीकर आणि कार्याध्यक्ष डॉ. रविराज फुरडे, प्रमुख कार्यवाह प्रकाश गव्हाणे, उपाध्यक्ष प्रा. प्रमिलाताई देशमुख, सहकार्यवाह प्रकाश महामुनी आणि कोषाध्यक्ष बी.आर. देशमुख यांनी केले आहे.
Post Views: 57