Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

तरुण भारतbyतरुण भारत
June 20, 2026
in marathwada
0
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
धाराशिव – महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून सीबीआय विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
निकाल देताना न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने नमूद केले की, संपूर्ण खटला माफीच्या साक्षीदार पारसमल जैन यांच्या साक्षीवर उभा होता. मात्र त्यांच्या जबाबांमध्ये वारंवार विसंगती, बदल आणि तफावत आढळून आल्याने त्यांची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही. त्यामुळे सरकारी पक्षाचा खटला कमकुवत ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने तपासातील अनेक त्रुटींचाही उल्लेख केला. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले नाहीत, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) गोळा करण्यात आले नाहीत, तसेच आरोपी परस्पर संपर्कात होते का याबाबत कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. घटनास्थळ, वाहनाचा रंग, आरोपींच्या हालचाली आणि पैशांच्या व्यवहारांबाबतही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मोठी तफावत आढळून आली.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की, पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय मतभेद आणि वैमनस्य होते, हे पुराव्यांवरून दिसून येते. पवनराजे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही प्रशासनाकडे केली होती. मात्र केवळ राजकीय वैमनस्य असल्याने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवता येत नाही. त्यासाठी ठोस, सुसंगत आणि कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावे आवश्यक असतात.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने असेही नमूद केले की, २० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देणे ही दुर्दैवी बाब आहे. एका लोकनेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाली, मात्र तपासातील त्रुटींमुळे दोष निश्चित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे संशयाचा फायदा देत सर्व आरोपींना मुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
३ जून २००६ रोजी मुंबईहून पुण्याकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पवनराजे निंबाळकर यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास कळंबोली पोलीस, नवी मुंबई गुन्हे शाखा आणि अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
तब्बल दोन दशकांच्या कायदेशीर लढाईनंतर आलेल्या या निकालामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हा निकाल निंबाळकर कुटुंबीयांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
चौकट
दुर्दैवी निकाल ; उच्च न्यायालयात दाद मागणार – खासदार ओमराजे निंबाळकर
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा निकाल न्यायव्यवस्थेचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया देत पुढील लढाई उच्च न्यायालयात लढण्याचा निर्धार व्यक्त केला. “या खटल्याच्या निकालासाठी तब्बल 20 वर्षांचा कालावधी लागला. एवढ्या प्रदीर्घ सुनावणीनंतर असा निर्णय येत असेल, यापेक्षा न्यायव्यवस्थेचे मोठे दुर्दैव असू शकत नाही,” असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. सुरुवातीच्या पोलिस तपासावर दबाव असल्यामुळेच आम्ही उच्च न्यायालयात जाऊन तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. सीबीआयने तपास केला, मात्र त्यामध्येही मोठा कालावधी गेला. आता वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पवनराजे यांची हत्या झाली, ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयाने राजकीय वैमनस्य असल्याचेही मान्य केले आहे. मग पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी केली? असा सवाल उपस्थित करत त्यांनी न्यायासाठी पुढील कायदेशीर लढा सुरू ठेवण्याचे संकेत दिले.
Post Views: 31
Previous Post

राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंत्रोळी शाळेत अभिवादन  

Next Post

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा न्यायालयीन कक्षेत; नियुक्ती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा न्यायालयीन कक्षेत; नियुक्ती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सोलापूर जिल्ह्यातील 1,078 गावांतील शेतकरी

July 27, 2026

एकल पालक असणाऱ्या विद्यार्थ्यांना महापौरांच्या हस्ते छत्री वाटप…..#solapur

July 27, 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात सोलापुरात निघाला विराट मोर्चा

July 27, 2026

आनंदराज आंबेकडकर म्हणाले उपवर्गीकरण होऊ देणार नाही…..

July 27, 2026

उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी……..#solapurnews #solapurupdate

July 27, 2026
भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1004218

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!