Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा न्यायालयीन कक्षेत; नियुक्ती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष

तरुण भारतbyतरुण भारत
June 20, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या परीक्षेला मुंबई आणि नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने नियुक्ती प्रक्रियेबाबत शिक्षकांसह शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.
         राज्यभरातील केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत काही परीक्षार्थींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून न देणे, उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्याची संधी न देणे, तसेच विविध शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्याने समानतेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
        दुसरीकडे, शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासन स्तरावर भरती व पदोन्नती प्रक्रिया कायदेशीर चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच पुढील प्रशासकीय प्रक्रिया राबविली जाणार असल्याचेही संबंधित सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
             दरम्यान, केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय बाब नसून शालेय शिक्षण व्यवस्थेच्या नेतृत्वाशी निगडित असल्याने न्यायालयीन निर्णयानंतर या प्रक्रियेची दिशा आणि परिणाम अधिक स्पष्ट होणार आहेत.
चौकट
काही जिल्हा परिषदांमध्ये विभागीय परीक्षेत यशस्वी ठरलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुख पदाचे नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे न्यायालयीन सुनावणी आणि नियुक्ती प्रक्रिया यांचा समांतर प्रवास सुरू असल्याने या विषयाकडे राज्यातील हजारो शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
कोट
सदर भरती प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पार पाडत आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रिया बाबत शासन स्तरावरती सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाच्या अधीन राहून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही खोडसळ परीक्षार्थी या भरती प्रकरणात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना न्यायालयाने फटकारले आहे.  हा विषय सध्यातरी न्यायप्रविष्ठ असल्याचे मत केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांनी व्यक्त केले आहे.
Post Views: 43
Previous Post

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

Next Post

विकासाच्या वाटा रुंदावल्या रस्त्यांसाठी १०.५० कोटींची तरतूद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विकासाच्या वाटा रुंदावल्या रस्त्यांसाठी १०.५० कोटींची तरतूद

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

August 6, 2026
पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

August 6, 2026

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

August 6, 2026
डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

August 6, 2026

मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांची वर्षा निवासस्थानी बैठक

August 6, 2026

टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटरतर्फे राज्यस्तरीय “विज्ञान निबंध” लेखन स्पर्धेचे आयोजन

August 6, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1031453

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!