पंढरपूर – शिंदे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत कथितरीत्या केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पंढरपूर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. येथील तहसील कार्यालयासमोर पंढरपूरमधील विविध पत्रकार संघटना व पत्रकारांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा तसेच भविष्यात पत्रकारांविरोधात बेजबाबदार व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी केली.
यावेळी पत्रकार संरक्षण हक्क कायदा तातडीने लागू करून पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षिततेची हमी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
या प्रसंगी डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष प्रवीण नागणे, मराठी पत्रकार संघाचे हरिभाऊ प्रक्षाळे, रामभाऊ सरवदे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनानंतर या संदर्भातील निवेदन तहसीलदार सचिन लुंगटे यांना देण्यात आले.
Post Views: 14