सोलापूर – टीईटी परीक्षा अधिकृतरीत्या रद्द झाल्यानंतर परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षा जाहीर झाल्यापासून शिक्षकांनी नियमित अध्यापनासोबतच दिवसरात्र अभ्यास करून तयारी केली होती. जणगणना, एसआयआर मॅपिंग तसेच इतर शासकीय जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी अभ्यासासाठी वेळ काढल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
ऐन परीक्षेच्या तोंडावर परीक्षा रद्द झाल्याने अनेक शिक्षकांचा वेळ, श्रम आणि मानसिक तयारी वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. काही शिक्षकांनी परीक्षेसाठी रजा घेतली होती, प्रवासाचे नियोजन केले होते तसेच आर्थिक खर्चही केला होता. त्यामुळे या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“शासनाने नव्या टीईटी परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच परीक्षार्थी शिक्षकांच्या परिश्रमाचा योग्य सन्मान करून त्यांना न्याय द्यावा.”
— मुख्याध्यापक वागेश शास्त्री
Post Views: 14