
माढा : माढा शहरामध्ये भर चौकात मारहाण करीत दोघा तरुणांना उचलून गाडी टाकून पळवून नेऊन जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून जखमी सुरज मारुती कदम वय ३२ राहणार माढा यांनी माढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण ७ ओळखीच्या व इतर ३ अनोळखी आरोपी विरुद्ध अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०९, १४०(१) यासह एकुण ७ कलमान्वये एकुण ७ आरोपीसह इतर अनोळखी दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल असून यापैकी तीन आरोपींना माढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर चार आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांनी सांगितले.
याबाबतची हकीकत अशी की फिर्यादी सुरज कदम व आरोपी राजेश गिड्डे राहणार सापडणे भोसे यांच्यासोबत शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सोहम शिंदे राहणार फुलचिंचोली तालुका पंढरपूर या ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या कामावरून शाब्दिक वादावादी झाली. यावेळी गिड्डे यांनी कदम यास बघून घेण्याची धमकी दिली.
यानंतर शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ९.३० वाजता फिर्यादी सुरज कदम राहणार माढा आणि त्याचा मित्र अथर्व विलास उबाळे राहणार दारफळ यांना शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे थांबलेले असताना पांढऱ्या रंगाच्या बोलोरो जीप मधून एम एच ४५ ए यु २८४७ ज्योतीराम दत्तू गिड्डे मनोहर बाळू गुजले विलास अर्जुन राऊत अर्जुन गोरख सावंत विलास गोरख गिड्डे खाली उतरले त्या पाठोपाठ तीन मोटरसायकलस्वार वरून राजेश दत्तात्रय गिडे भरत अवचर आणि इतर अनोळखी आरोपींनी तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत मारहाण केली व बोलेरो जीप मध्ये उचलून टाकले यानंतर जाधववाडी सापडणे दिशेने घेऊन जाऊन मित्र अथर्व उबाळे सह फिर्यादीस लोखंडी रॉडणे केबल वायरणे पाठीवर पोटावर डोकीत हातावर मारहाण करून जखमी केले. यानंतर कुणाचातरी फोन आल्यानंतर माढ्यामधील माढेश्वरी मंदिराजवळ आणून सोडले यावेळी माढा पोलिसांची गाडी येथे आली आणि आम्हाला ग्रामीण रुग्णालय माढा येथे उपचारासाठी आणले.
माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे हे पुढील तपास करीत असून एका जखमेवर माढ्यात उपचार सुरू असून दुसऱ्या जखमी तरुणाला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माढा शहरातील तरुणांमध्ये या घटनेने मोठा संताप व्यक्त केला जात असून दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये तरुणांची मोठी गर्दी होती. सर्व आरोपींना अटक करून या अपहरण आणि मारहाणी मध्ये असलेल्या मोटरसायकल आणि फोर व्हीलर ताब्यात घेईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
Post Views: 12