अक्कलकोट – डॉक्टर डे, शेतकरी दिन व सी.ए. डे निमित्त लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन क्लबचे अध्यक्ष ला. अभय खोबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या प्रसंगी अक्कलकोट शहराचे नगराध्यक्ष मीलन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते डॉ. संतोष मोटे (डायबेटॉलॉजिस्ट), डॉ. मल्लीनाथ पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. अमरदीप कंदले व सौ. डॉ. दीपा कंदले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच शेतकरी दिनानिमित्त प्रगतशील शेतकरी श्री जोकारे, टोमॅटो किंग श्री जोकारे तसेच प्रमोद पाटील या प्रगतिशील शेतकऱ्यांचाही नगराध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सी.ए. डे निमित्त सोलापूरचे सी.ए. श्री राच्चा व अक्कलकोटचे सी.ए. ओमकार उटगे यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या व्यावसायिक योगदानाचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी प्रांतपाल ला. राजशेखर कापसे, ला. प्रभाकर मजगे, ला. शिरीष पंडित, लायन्स स्कूल कमिटीचे चेअरमन ला. राजेंद्र हत्ते, ला. गौरीशंकर कल्याणशेट्टी, ला. मल्लीनाथ साखरे, ला. विठ्ठल तेली, सचिव ला. शिवशरण खुबा, ला. सुभाष गडसिंग, तसेच मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, कर्मचारी व लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी डॉ. संतोष मोटे यांनी मधुमेह प्रतिबंध, योग्य आहार, नियमित व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थितांनी लाभ घेतला.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटने सामाजिक बांधिलकीची जपणूक करत प्रेरणादायी उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.