अकलूज – माळशिरस तालुक्यातील मौजे चौंडेश्वरवाडी येथे शेतमजूर महीलेच्या डोक्यात गोळी घालुन शेत मालकाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उषा विजय साठे व विजय साठे हे दलीत समाजातील पती पत्नी सचिन जगन्नाथ देशमुख यांच्या चौंडेश्वरवाडी येथील शेतात गेली अनेक वर्ष शेतमजूर म्हणून काम करत होते.सोमवार दि.6 जुलै रोजी उषा व विजय साठे देशमुख यांच्या शेतात मजुरीस गेले होते.दुपारच्या सुमारास विजय साठे हे शेतात काम करत होते तर उषा साठे या रस्त्यावर होत्या.याचवेळी सचिन जगन्नाथ देशमुख याने शेतात येवुन जवळच्या पिस्तुल मधुन उषा विजय साठे यांच्या डोक्यात गोळी झाडली.देशमुख याने झाडलेली गोळी उषा साठे यांच्या डोक्यात आरपार जावुन जागीच कोसळल्या. बंदुकीच्या गोळीचा व पत्नी ओरडल्याचा आवाज एकुन विजय साठे रस्त्यावर आले असता पत्नी उषा ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर सचिन देशमुख याच्या हातात रिव्हॉल्वर दिसला.त्यानंतर सचिन देशमुख घटनास्थळावरुन निघुन गेला तर विजय साठे यांनी जखमी पत्नीस अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता डाँक्टरांशी उषा साठे हिस मृत झाल्याचे घोषित केले.
त्यानंतर सदर घटनेची माहीती परीसरात वाऱ्यासारखी पसरली होती,अकलूज पोलीसांना माहिती मिळताच पो नि. निरज उबाळे व त्याच्या पथकाने घटस्थळी जावुन माहिती घेवुन पंचनामा केला तर सदर घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे ,उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांनीही घटनास्थळी भेट देवुन माहीती घेतली.
सदर घटनेबाबत मयताचे पती विजय साठे यांच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींला अटक केली आहे.
Post Views: 18