सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने पंचवटी (नाशिक) येथे झालेल्या राज्य शालेय युग मून दो स्पर्धेत येथील संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुलच्या चार खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

सोनाक्षी मोहन माडे हिने १७ वर्षांखालील वयोगटात (४२ किलो वजन गट) आणि श्रद्धा तानाजी सरवदे हिने १७ वर्षांखालील वयोगटात (३८ किलो वजन गट) उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १४ वर्षांखालील वयोगटात वैभव नरसिंग माडे (३८ किलो वजन गट) आणि वेदांत संतोष सोमा (३५ किलो वजन गट) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. नरुटे, श्री. कलशेट्टी आणि क्रीडा प्रशिक्षक विवेक मिस्कीन यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, संचालिका डॉ. राधिकाताई चिलका आणि प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.























