माळीनगर – माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या चेअरमन पदी मोहन लांडे यांची निवड करण्यात आली. येथील सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन पदी मोहन लांडे हे विराजमान होत आहे.

चार वर्षांपूर्वी चेअरमन पदी निवड झालेल्या राजेंद्र गोपाळराव गिरमे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने लांडे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर व्हाइस चेअरमन पदी असलेले निखिल कुदळे यांना होल टाइम डायरेक्टर पद देऊन पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर विशाल जाधव यांची व्हाइस चेअरमन पदी निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.

राजेंद्र गोपाळराव गिरमे हे सध्या संचालक मंडळावर संचालक म्हणून कार्यरत आहेतच. राजेंद्र गिरमे हे यापूर्वी कारखान्यावर 1989 साली ते प्रथम संचालक म्हणून निवडून आले. नंतर पुढे ते बारा वर्ष उपाध्यक्ष होते. पाच वर्ष होल टाइम डायरेक्टर होते. पुढे पंधरा वर्षे त्यांनी कार्यकारी संचालक पद भूषविले. कंपनी कायद्याप्रमाणे वयाच्या 70 व्या वर्षी पर्यंतच कार्यकारी संचालक पदी राहता येते त्यामुळे सत्तर वर्षे वयानंतर त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सहा डिसेंबर 2022 पासून ते गेली चार वर्ष चेअरमन म्हणून पदावर होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मोहन लांडे यांची संचालक मंडळाने निवड केली.

नूतन चेअरमन पदी मोहन लांडे यांची निवड झाल्यानंतर तसेच विशाल जाधव उपाध्यक्षपदी आणि होल टाईम डायरेक्टर पदी निखिल कुदळे यांची निवड झाल्यानंतर सभासद, कामगार, परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.






















